
-शामराव गावडे
नवेखेड : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणारी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेचा उद्देश शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्वाच्या परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. गत वर्षी आणि चालू आर्थिक वर्षात मेअखेर जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३० विद्यार्थ्यांचे ४० लाख ४४ हजार ३४० रुपये अनुदान प्रलंबित आहे.