सांगली जिल्ह्यात 412 कोरोनामुक्त; नवे 361 रुग्ण

जयसिंग कुंभार
Friday, 9 October 2020

सांगली जिल्ह्यात आज नवे 361 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 40 हजार 330 इतकी झाली आहे.

सांगली ः जिल्ह्यात आज नवे 361 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 40 हजार 330 इतकी झाली आहे. त्यातील 33 हजार 784 रुग्ण बरे झाले. दिलासादायक म्हणजे गेल्या आठवडाभरापासून रोजचे नवे रुग्ण सरासरी 300 ते 400 च्या दरम्यानच आहेत. महापालिका क्षेत्रात आज कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. 412 जण आज दिवसभरात कोरोनामुक्त झाले. 

आज जिल्ह्यात 10 जणांचा, तर सातारा जिल्ह्यातील एकाचा असे 11 मृत्यू झाले. दिलासादायक म्हणजे आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, शिराळा अशा चार तालुक्‍यांत आज मृत्यूचा आकडा शून्य राहिला. खानापूर, जत, मिरज, वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी एक, तर तासगाव, पलूस तालुक्‍यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला. 

गेल्या काही दिवसांत नवे रुग्ण आणि मृत्यू संख्या घटत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड सेंटरमधील बेडही आता रिकामे होत आहेत. गृह अलगीकरणात जिल्ह्यात तीन हजार 646 रुग्ण आहेत. जिल्ह्यात चार हजार 957 म्हणजे जवळपास पाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. 

सांगली जिल्ह्यातील स्थिती 

  • उपचाराखालील रुग्ण- 5059 
  • ग्रामीण भागातील रुग्ण- 287 
  • शहरी भागातील रुग्ण- 25 
  • महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 49 
  • आजअखेरचे मृत्यू- 1487 
  • चिंताजनक रुग्ण- 705 

संपादन : युवराज यादव


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: 412 corona free in Sangli district; 361 new patients