जिल्ह्यात पकडले 48 कॉपीबहाद्दर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

बारावी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाचा आज पेपर होता. नगर येथील शिक्षण विभागाच्या चार पथकांनी पाथर्डीतील केंद्रांची तपासणी केली. श्रीतिलोक जैन विद्यालयात एका पथकाने अडीच तास थांबून नऊ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.

पाथर्डी ः नगरमधील शिक्षण विभागाच्या पथकाने बारावी परीक्षेच्या जिल्ह्यातील सात केंद्रांवर छापे घालून 48 कॉपीबहाद्दरांना पकडले. त्यात संगमनेर तालुक्‍यातील 8, पाथर्डीत 30, तर जामखेड तालुक्‍यातील 10 परीक्षार्थींना पकडण्यात आले. 

वाचा कॉपी न दिल्याने तलाठ्याला चोपले कोणती कॉपी ते पहा... 

बारावी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाचा आज पेपर होता. नगर येथील शिक्षण विभागाच्या चार पथकांनी पाथर्डीतील केंद्रांची तपासणी केली. श्रीतिलोक जैन विद्यालयात एका पथकाने अडीच तास थांबून नऊ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. दुसऱ्या पथकाने खरवंडीत आठ विद्यार्थ्यांना पकडले. तनपुरवाडी येथे एक पथक तीन तास थांबून होते. तेथे तीन विद्यार्थ्यांना पकडले. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात 10 विद्यार्थी कॉपी करताना पकडले. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रुक येथे आठ, तर जामखेड तालुक्‍यातील होशिंग विद्यालयात 6 व नान्नजमधील नंदादेवी विद्यालयात 4 कॉपीबहाद्दर पथकाने पकडले. 

वाचा सालगड्याची शेजाऱ्याच्या मुलीवर झडप 

दरम्यान, गतवर्षी पाथर्डी तालुक्‍यात कॉपीमुक्त चळवळ मोठ्याप्रमाणात राबविण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष प्रयत्न केले होते. मात्र, यंदा पुन्हा पाथर्डी तालुक्‍यात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट झाला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाथर्डी तालुका चर्चेचा विषय झाला आहे. 

वाचा अग्निशमन बंब मिळेल का हो..... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 students caught while copying