वैद्यकीय प्रवेशाकरिता घेतले 50 लाख रुपये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पोलिस कोठडीत रवानगी 
वैद्यकीय प्रवेशाकरिता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात संदीप शहा याच्यावर सोलापुरात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. सोमवारी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच त्यास अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात 28 लाख, दुसऱ्या गुन्ह्यात 10 लाख 34 हजारांची फसवणूक केली आहे. तिसरा गुन्हा 50 लाख फसवणुकीचा दाखल झाला आहे.

सोलापूर : एमबीबीएस शिक्षणाकरिता व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे खोटे सांगून शिक्षकाची 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संदीप जवाहर शहा याच्यावर सोलापुरात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अटक केली असून 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

शिक्षक राजेसाब हुसेनसाब कोटनाळ (वय 56, रा. फुरडे रेसिडेन्सी, विजयपूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते इंडी (जि. विजयपूर) येथील गव्हर्न्मेंट उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये नोकरीला आहेत. संदीप शहा याने एमबीबीएस प्रवेशासंदर्भात जाहिरात दिली होती. कोटनाळ यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधून शहा यांची भेट घेतली. त्यांचा मुलगा आशिक कोटनाळ यास एमबीबीएस शिक्षणाकरिता महाविद्यालय व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देतो, असे शहा यांनी सांगितले. मुलाच्या नावाने बनावट ई-मेल तयार केले. वैयक्तिक पासवर्ड वापरून ऑनलाइन फॉर्ममध्ये संदीप शहा याने स्वतःचा मोबाईल नंबर दिला. 5 मे 2016 रोजी एमएच-सीईटी रोजीच्या परीक्षेकरिता ऑनलाइन फॉर्ममध्ये जातीची खोटी माहिती भरली. खरी माहिती भरून दिली असतानाही ऑनलाइन फॉर्ममध्ये खोटी व बनावट माहिती भरली.

वैद्यकीय प्रवेशासंदर्भात कोणताही संबंध नसताना वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेऊन देतो असे सांगून 2016, 2017 आणि 2018 या शैक्षणिक कालावधीचे नुकसान केले. प्रवेशाकरिता वेळोवेळी 50 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे तपास करीत आहेत. 

पोलिस कोठडीत रवानगी 
वैद्यकीय प्रवेशाकरिता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात संदीप शहा याच्यावर सोलापुरात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. सोमवारी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच त्यास अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात 28 लाख, दुसऱ्या गुन्ह्यात 10 लाख 34 हजारांची फसवणूक केली आहे. तिसरा गुन्हा 50 लाख फसवणुकीचा दाखल झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakhs for medical admission in Solapur