जिल्हा बॅंकेचे 608 कोटी पीक कर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सांगली-  जिल्हा बॅंकेचे पीक कर्जाचे उद्दीष्ठ 800 कोटी रूपये असून आतापर्यंत 608 कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे. उर्वरीत कर्जवाटप करून उद्दीष्ठ पूर्ण केले जाईल अशी माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी दिली. 

सांगली-  जिल्हा बॅंकेचे पीक कर्जाचे उद्दीष्ठ 800 कोटी रूपये असून आतापर्यंत 608 कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे. उर्वरीत कर्जवाटप करून उद्दीष्ठ पूर्ण केले जाईल अशी माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी दिली. 

ते म्हणाले, ""जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची आहे. यावर्षी बॅंकेला पीक कर्जाचे उद्दीष्ठ 800 कोटी रूपये इतके आहे. आतापर्यंत 89 हजार शेतकऱ्यांना 608 कोटी रूपये पीक कर्ज वाटप केले आहे. प्रतिवर्षी जिल्हा बॅंकेला शेती कर्ज वाटपात 17 कोटी रूपये तोटा होतो. मात्र कर्ज वाटपात तोटा सहन करूनही बॅंक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आघाडीवर आहे. अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. मात्र मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ झाले नाही. जिल्ह्यातील सोसायट्यांकडे 695 कोटी रूपयांची थकबाकी आहे. जेसीबी, जीप, ट्रॅक्‍टर व औजारे, पॉलिहाऊस, शेतजमिन खरेदी, घर बांधणी, पाणी पुरवठा योजना, विहिरीसाठी दिलेल्या कर्जाची ही थकबाकी आहे. विकास सोसायट्यांनी कारवाई करून कर्जवसुली करणे आवश्‍यक आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""जिल्ह्यातील 62 हजार 718 शेतकऱ्यांना 341 कोटी रूपये कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या परंतू अन्य थकीत कर्ज नसलेल्या 9 हजार 542 शेतकऱ्यांना परत 52 कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे. ज्यांना अल्प मुदत कर्ज माफ झाले आहे, परंतू त्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकीत आहे, त्यांना नियमानुसार नविन कर्ज वाटप करता येणार नाही. कर्जमाफीच्या रकमेवरील व्याजाबाबत शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ते वसुल केले जात आहे. हे व्याज शासनाने दिल्यास वसुल व्याजाची रक्कम परत दिली जाईल. बॅंकेची वसुली 77 टक्के असून बॅंकेच्या नियमाप्रमाणे 90 टक्के व्याज वसुली आहे. थकबाकीदारांविरोधात आम्ही ऍक्‍शन घेत आहोत. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही.'' 
सहा संचालकांच्या संस्थाकडे 257 कोटी- 
जिल्हा बॅंकेतील सहा संचालकांच्या संस्था थकबाकीत आहे. थकबाकीची रक्कम 257 कोटी रूपये इतकी आहे. ती वसूल करण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 608 crore crop loan distribute by District Bank