esakal | आईसोबत पाणी आणण्यासाठी निघालेल्या बालकाचा दुर्दैवी अंत; इस्लामपूर परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

आईसोबत पाणी आणण्यासाठी निघालेल्या बालकाचा दुर्दैवी अंत; इस्लामपूर परिसरात हळहळ

आईसोबत पाणी आणण्यासाठी निघालेल्या बालकाचा दुर्दैवी अंत; इस्लामपूर परिसरात हळहळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) :आईसोबत पाणी आणण्यासाठी निघालेल्या ७ वर्षे वयाचा बालक टेम्पो खाली आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. नरसिंग गोविंद जाधव (वय ७) असे त्या बालकाचे नाव आहे. आईच्या डोळ्यादेखतच बाळाचा जीव गेल्याने आईने जाग्यावरच हंबरडा फोडला. शिवपुरी (ता. वाळवा )(Shivpuri (Tal. Walwa) येथे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेने परिसर हळहळला.याप्रकरणी टेम्पोचालक अर्जुन सदाशिव पाटील( वय ४०, रा. कार्वे, ता. वाळवा) याच्यावर इस्लामपूर(Islampur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(7-years-ago-child-accident-case-in-islampur-crime-marathi-news)

घटनेची माहिती अशी की ,

आज सकाळी मृत बालक नरसिंग व त्याचे आणखी दोन भाऊ आईसोबत पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे निघाले होते. चालण्याच्या ओघात आईने लहान व मोठ्या मुलग्यासोबत रस्ता पार केला. मधला मुलगा नरसिंग मागेच राहिला. आईचे त्याच्याकडे लक्ष गेले परंतु तेवढ्यातच रस्त्यावरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा चारचाकी टेम्पो दिसला.

हेही वाचा- 'संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकल करू नये'

टेम्पो येतोय हे लक्षात येताच आईने टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नरसिंग रस्ता पार करण्यासाठी पुढे आला आणि भरधाव टेम्पोच्या चाकखाली आला. धडक इतकी जोराची होती की, या धडकेत नरसिंग जागीचच मृत्यू पावला. डोळ्यादेखत बाळाचा मृत्यू झाल्याने आईने जाग्यावरच हंबरडा फोडला. मुलाचे वडील गोविंद रंगापा जाधव (वय ४०, मूळ रा. बारानंबरपाटी, जिल्हा लातूर, सध्या रा. वाघवाडी, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.