बेळगाव एपीएमसीत कांद्याच्या ७० गाड्या दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

70 onion carts arrived Belgaum APMC  Potato price hike Rs 200

बेळगाव एपीएमसीत कांद्याच्या ७० गाड्या दाखल

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याच्या ७० गाड्यांची आवक झाली होती. यामध्ये कर्नाटकातील १० व महाराष्ट्रातील ६० गाड्यांचा समावेश आहे. कांद्याचा दरही गेल्या बाजाराच्या तुलनेत स्थीर होता. तर बटाटे दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली.महाराष्ट्रातील पुणे व अहमदनगर या ठिकाणचे सुमारे ६० गाड्या तर कर्नाटकातील विजापूर भागातील १० गाड्या कांदे दाखल झाले होते. महाराष्ट्रातील कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर होता. तर कर्नाटकातील कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर होता. बाजारात गेल्या काही दिवसांवासून ठेवणीतला चांगला दर्जाचा कांदा दाखल होत आहे.

यामुळे कांद्याला मागणीही वाढली आहे. अजून महिनाभर हाच दर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वळीव अधिक झाल्यास परिणाम होण्याची शक्यता आहे. अन्यथा कांदा दर हाच राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.सध्या लग्न सराई असल्यामुळे तसेच साठवणुकीचा कांदा बाजारात असल्यामुळे कांद्याला मागणी आहे.

याचबरोबर स्थानिक, आग्रा व इंदूर बटाटे दाखल झाले होते. इंदूरच्या ८ गाड्या होत्या. या बटाट्यांना प्रतिक्विंटल २ हजार ते २३०० रुपये दर होता. स्थानिक बटाट्याच्या २ हजार पिशव्या दाखल झाल्या होत्या. यांना प्रतिक्विंटल २२०० ते २३०० रुपये दर मिळाला. या दरात २०० रुपयांची वाढ होती.

तसेच आग्रा बटाट्याच्या ४ गाड्या दाखल झाल्या होत्या. याला सुमारे २ हजार रुपये दर मिळाला. त्याचबरोबर पश्‍चिम भागातील लाल मातीच्या बटाट्यालाही अधिक मागणी दिसून आली. या प्रतिक्विंटल २६०० रुपये दर मिळाला.

एपीएमसीत चांगल्या दर्जाचा कांदा दाखल होत आहे. सध्या लग्न सराई व ठेवणीतला कांदा येत असल्याने मागणी अधिक वाढली आहे. गेल्या बाजाराच्या तुलनेत काद्याचे दरही स्थीर आहेत. तसेच स्थानिक बटाट्याला २०० रुपये वाढीव दर मिळाला.

-महेश कुगजी, व्यापारी

Web Title: 70 Onion Carts Arrived Belgaum Apmc Potato Price Hike Rs 200

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top