नुकसानग्रस्त शेतीचे 8 कोटी बॅंकेत जमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोल्हापूर : पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीसाठी 121 कोटी रुपये तात्काळ वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. रविवारपासून (ता. 5) ही रक्कम वाटप करण्यासाठी तहसिलदार पातळीवर नियोजन केले होते. त्यानुसार आज 
121 कोटींपैकी 8 कोटी 6 लाख 39 हजार रुपये वाटप केले. या प्रक्रियेने आता गती घेतली असून ज्या-ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना वेळेत मदत निधी देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत झाले आहेत. 

ऑगस्टमध्ये झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ऊस, भात, भुईमूग, बाजारीसह इतर कडधान्यांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार 571 शेतकऱ्यांना 121 कोटी 12 लाख 28 हजार रुपये वाटप केले जाणार आहे. यापैकी, आठव्या दिवशीच 8 कोटी 6 लाख 39 हजार रुपये बॅंकांत जमा केले आहेत. उर्वरित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सर्व यंत्रणा गतीमान करण्याचे काम जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी केली आहे. त्यामुळे, शेती नूकसानीचे हेक्‍टर ठरल्याप्रमाणे सर्व रक्कम बॅंकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

आता बॅंकांनी ही रक्‍कम तात्काळ संबंधीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर करावी लागणार आहे. यात सुरूवातीच्या टप्प्यात शिरोळ तालुक्‍यात 40 लाख 65 हजार रुपये, हातकणंगले तालुक्‍यासाठी 1 कोटी 12 लाख 56 हजार रुपये, पन्हाळा तालुक्‍यात 59 लाख 72 हजार आजऱ्यात 12 लाख 76 हजार रुपये, गडहिंग्लजमध्ये 15 लाख 37 हजार, शाहुवाडीत 32 लाख 61 हजार रुपये वाटप केले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 crore deposited in bank for Damaged crop