कोयना धरणातील १०५ टीएमसी पाण्यापैकी ६७.५ टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी वापरला जातो. त्यातून ३१६० मिलियन युनिट वीजनिर्मिती केली जाते.
चिपळूण : कोयना प्रकल्पातून (Koyna Project) वीजनिर्मिती करणाऱ्या यंत्रणेचे ८० टक्के आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. २० टक्के काम शिल्लक आहे. वर्षभरात ते पूर्ण करून राज्यात मागणीच्या वेळी या प्रकल्पातून सक्षमतेने वीज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली. नव्या वर्षात कोयना प्रकल्प वीजनिर्मिती करण्यासाठी पुन्हा नव्याने सज्ज असेल, असा विश्वास मुख्य अभियंता चोपडे यांनी व्यक्त केला.