बेडकिहाळ येथील शेतकरी गजानन अलगौडा देसाई हे सध्या ८२ वयाचे आहेत. त्यांची शेती सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे आहे.
बेडकिहाळ : लहानपणापासून जडलेलेली सायकलची (Cycles) आवड उतार वयातही कायम जोपासत ८२ व्या वर्षीही सायकलीने रोज ६० किलोमीटर प्रवास करून आरोग्यवंत जगण्याचा आदर्श परिपाठ घालून दिलेले एक अवलिया बेडकीहाळमध्ये आहेत. गजानन अलगौडा देसाई (Gajanan Desai) असे त्यांचे नाव आहे.