धक्कादायक! वर्षभरात ८८१ एड्‌सबाधित; ५६ गर्भवतींचा समावेश

881 ads infected during the year belgaum health marathi news
881 ads infected during the year belgaum health marathi news

 बेळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ८८१ जणांना एचआयव्ही-एड्‌सची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यात ३५ ते ४९ वयोगटातील सर्वाधिक ४०६ जणांना एड्‌सची लागण झाली. यात २०० पुरुष आणि २०५ महिलांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ २५ ते ३४ वयोगटातील २०९ तरुण-तरुणींचा समावेश आहे. 
एड्‌स नियंत्रणासाठी व्यापक जागृती केली जाते. सुरक्षित लैंगिक संबंधाच्या माहितीसाठी कोट्यवधी रुपये जनजागृतीवर खर्च केला जातो. तरी असुरक्षित लैंगिक संबंध आणि एकापेक्षा अधिक जणांशी लैंगिक संबधांमधून एचआयव्ही-एड्‌सचे रुग्ण वाढून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान ८८१ जणांना एड्‌सची लागण झाली आहे.

चाचण्या सव्वा लाख
दरवर्षी सुमारे दीड ते पावणे दोन लाख एचआयव्ही-एड्‌सच्या चाचण्या केल्या जातात. पंरतु, यंदा कोरोनाचा प्रभाव, लॉकडाऊन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कोविड-१९ नियंत्रणाची दिलेली जबाबदारी लक्षात घेऊन कमी चाचण्या करण्यात आल्या. २०२०-२१ या कालावधीत सुमारे सव्वा लाख चाचण्या करण्यात आल्या असून, यात ८८१ जणांना एचआयव्ही आणि एड्‌स झाल्याचे निदानझाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत कमी चाचण्या करूनही एड्‌सबाधितांची सरासरी ०.०८ टक्के आहे. दरम्यान, २००७ ते २०२१ या कालावधीत सुमारे ७० हजार जणांना एड्‌सची लागण झाली आहे. 

एड्‌सबाधितांतअल्पवयीन गर्भवती
एचआयव्ही-एड्‌सबाधितांमध्ये अल्पवयीन गर्भवतींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ८८१ जणांना एड्‌स झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात ५६ एचआयव्ही-एड्‌स गर्भवती आहेत. यात १५ ते १९ वयोगटातील ७ युवतींचा समावेश आहे. २० ते २४ या वयोगटामधील २८ गर्भवती युवतींना एड्‌स झाला आहे. तसेच, २५ ते ३४ वयोगटातील २० महिलांना एड्‌सची लागण झाली आहे. चार गटांमध्ये ५६ गर्भवतींना एड्‌स झाल्याचे निदान झाले आहे; तर २५ ते ३४ वयोगटात एकाला आणि ३५ ते ४९ वयोगटात एका तृतियपंथियाला एड्‌स झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

एड्‌स होण्यामागील कारणे
 रक्त संक्रमण ः एकच इंजेक्‍शन वापरणे,   
   दूषित सुई, सिरिंज
 वेळेत काळजी न घेतल्यास बाधित 
   आईपासून मुलाला लागण होते
 असुरक्षित लैंगिक संबंध
एड्‌स टाळण्यासाठी
 व्यापक जागृती कार्यक्रम घेणे 
 लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर 
 अधिकृत, मान्यताप्राप्त रक्तपेढीतून संक्रमण 
 बाधित गर्भवतीपासून मुलांना धोका   
   टाळण्यासाठी वैद्यकीय सल्ला

काय आहेत एड्‌सची लक्षणे
 स्नायू दुखणे
 सतत ताप येणे
 सांधेदुखी, सुजलेल्या ग्रंथी
 अतिसार, रात्री घाम येणे

गेल्या वर्षभरात सुमारे सव्वा लाख चाचण्या करण्यात आल्या असून, यात ८८१ जणांना एचआयव्ही-एड्‌सची बाधा झाली आहे. यात दोन तृतियपंथीयांना एड्‌स झाल्याचे पुढे आले. व्यापक जागृती व सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत माहिती देण्यात येत असते. यंदाही ०.८ टक्के एड्‌सबाधित आढळून आले आहेत.
- डॉ. अनिल करबू, जिल्हा एचआयव्ही-एड्‌स नियंत्रणाधिकारी

वय    पुरुष    महिला    तृतीयपंथीय    एकूण
१४ पेक्षा कमी      १६      १२    ०      २८
१४ ते २४      २८      २३    ०      ५१
२५ ते ३४    ११८      ९०    १    २०९
३५ ते ४९    २००    २०५    १    ४०६
५० पेक्षा अधिक    १०८      ७९    ०    १८७
एकूण    ४७०    ४०९    २    ८८१

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com