esakal | पोलिसांनी निपाणीत चोरट्यांकडून केल्या ९ दुचाकी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

nipani

पोलिसांनी निपाणीत चोरट्यांकडून केल्या ९ दुचाकी जप्त

sakal_logo
By
- राजेंद्र हजारे

निपाणी : आचारी काम करीत विश्वास संपादन करीत दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडण्यात निपाणीतील बसवेश्वर चौक पोलिसांना यश आले. आरोपी पट्टणकुडी येथील अनिल आप्पासाहेब लंगोटे (वय ३२) यास बसवेश्वर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४ लाख ११ हजार रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निपाणी बसस्थानक परिसरात पोलिस गस्त घालत असताना शुक्रवारी (ता. १) सकाळी एक ३२ वर्षीय तरूण दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता तो संशयास्पद बोलू लागला. त्याला बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात नेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने विविध ठिकाणच्या ९ दुचाकी चोरल्याची कबूली दिली.

त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ४ लाख ११ हजार रूपये किंमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी निपाणी बसवेश्वर चौक पोलिस ठाणे परिसरातून एक , उगार खुर्द येथून एक तर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून ७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, हवालदार शेखर असोदे, जी. पी . बडीगेर , एम. एस . तेरदाळ, आर. बी. पाटील, प्रकाश सावोजी , श्रीशैल मळगी व सहकाऱ्यांनी यशस्वी तपास करून आरोपीस अटक केली आहे. त्यानुसार बसवेश्वर चौक पोलासांनी त्यास अटक करून तपास चालविला आहे.

loading image
go to top