ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रंग खेळणारी अन्य मुले व गल्लीतील लोक आणि कुटुंबीय त्वरेने अपघातस्थळी आले. तोपर्यंत तो मृत झाला होता.
भोज : रस्त्यावर रंगपंचमी (Rangpanchami) खेळत असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या (Tractor Accident) चाकाखाली सापडून नऊ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात बारवाड येथे कारदगा रस्त्यावर काल सकाळी ६.३० च्या दरम्यान झाला. प्रज्वल बाळासो पाटील (वय नऊ) असे मृत मुलाचे नाव आहे.