महापालिका क्षेत्रात 99 पॉझिटीव्ह रुग्ण होम आयसोलेशन 

बलराज पवार
Thursday, 30 July 2020

सांगली-  सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर 99 लोक होम आयसोलेशन करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. कोरोनाची लक्षणे नसलेले पण चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना काही नियमांवर होम आयसोलेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आतापर्यंत 99 जणांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. 

महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे अनेक लोक ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र ते पॉझिटिव्ह होते असे लोक या टेस्टमुळे समोर आले आहेत. सर्वांनी अँटिजेन टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहनही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. या टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची सोय देण्यात आली आहे. 25 जुलैपासून आजअखेर 99 पॉझिटीव्ह लोकांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे.

रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये जरी कोणी पॉझिटिव्ह आले तरी त्यांना आता त्यांच्याच घरी होम आयसोलेशन करण्याची मुभा देणेत येत आहे. फक्त ते ज्या घरात राहणार आहेत, त्याठिकाणी स्वतंत्र रूम आणि ऍटॅच टॉयलेट, बाथरूम आणि काळजी घेणेसाठी एक व्यक्ती असणे आवश्‍यक आहे. या सुविधा असतील तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्यक्तीला होम आयसोलेशन केले जाईल आणि महापालिका आरोग्य यंत्रणेकडून त्या व्यक्तीची दोन दिवसांनी तपासणी केली जाईल. त्यामुळे रॅपिड टेस्टबाबत कोणीही गैरसमज न करून घेता या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 99 positive patient home isolation in municipal area