Sangli News : ‘आलमट्टी’ उंचीप्रश्नी २४ जानेवारीला सांगलीत परिषद; महापूर नियंत्रण समितीचा बैठकीत निर्णय
५१६ मीटर पातळी कायम ठेवली तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण होत नाही. ५१७ ते ५१९ फुटांच्या पातळीला मात्र आपल्या भागात पाणी साचून राहते, हे तेथील अधिकारी खासगीत मान्य करतात. आलमट्टी धरणामुळे महापूर येतो, हे सत्य ते उघड मान्य करीत नाहीत.
सांगली : आलमट्टी धरणाच्या उंचीचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चळवळ उभारणे, महाराष्ट्र व कर्नाटकातील महापूर बाधितांची सांगलीत येत्या २४ जानेवारीला परिषद घेण्याचा निर्णय आज येथे झाला.