सोलापूरच्या विज्ञान केंद्रात पाहता येणार मिग-२१ लढाऊ विमान व पायलट विमान!

सोलापूर विज्ञान केंद्रात आता विद्यार्थ्यांना युद्धात वापरलेले रशियन बनावटीचे मिग-२१ हे लढाऊ विमान व पायलट ज्या विमानातून प्रशिक्षण घेतात ते, अशी दोन विमाने पाहण्याची संधी मिळणार आहे.
mig.jpg
mig.jpgsolapur sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर, धाराशिव व लातूर या तीन जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाबद्दलचे प्रात्यक्षिक ज्ञान, माहिती मिळावी म्हणून विद्यापीठालगत विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. सोलापूर विज्ञान केंद्रात आता विद्यार्थ्यांना युद्धात वापरलेले रशियन बनावटीचे मिग-२१ हे लढाऊ विमान व पायलट ज्या विमानातून प्रशिक्षण घेतात ते, अशी दोन विमाने पाहण्याची संधी मिळणार आहे.

रोबोटिक ॲण्ड इलेक्ट्रॉनिक, रसायनशास्त्र, फिजिक्स, बायोलॉजी, टेक्स्टाईल, स्वॉप्टवेअर, गणित, मायक्रोस्कोप अशा विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सोलापूर विज्ञान केंद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. तत्पूर्वी, इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना (खासगी व खासगी अनुदानित शाळा) ३५ रुपयांत या केंद्राला भेट देऊन ते पाहता येते. याशिवाय जिल्हा परिषद व महापालिकांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असून त्यांचे शुल्क संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरले जाते.

दरवर्षी सरासरी ३० हजार विद्यार्थी या केंद्राला भेट देतात, असा दावा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पण, विज्ञानाची गोडी ज्यांना लागावी म्हणून केंद्र सुरू केले, त्यांनाच याठिकाणी आणले जात नाही हे विशेष. दुसरीकडे मात्र केंद्राच्या तथा उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे ५० लाखांचा खर्च होतो.

सोलापूर विज्ञान केंद्रात पाहण्यासाठी...

  • रशियन बनावटीचे मिग-२१ लढाऊ विमान व पायलट ट्रेनिंग विमान

  • सायन्स पार्क (विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ४० प्रयोग दाखविले जातात)

  • तारामंडल डोम (दिवसा आकाशातील तारे पहाता येतात)

  • टेक्स्टाईल गॅलरी (कॉटन व कापड कसे तयार होते याचा प्रकल्प)

  • गंमतीदार विज्ञान (मनोरंजनात्मक प्रयोग)

  • थ्रिडी- शो, टेलिस्कोप

  • इनोव्हेशन व क्रिएटीव्हीटीसंबंधी प्रयोग करण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com