दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या API अरविंद काटे यांचा सत्कार
वालचंदनगर - (इंदापूर) येथील श्रीपाद ज्वेलर्स सराफी दुकानावर दरोडा टाकून पळून चाललेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करुन जेरबंद केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांचा लासुर्णे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दोन दिवसापूर्वी भवानीनगर मधील श्रीपाद ज्वलेर्स या दुकानावरती आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. गॅसकटरच्या साहय्याने दुकानाचा व तिजोरीचा दरवाजा कापून लाखो रुपयांचे सोन-चांदीची दागिने घेवून पळून जाण्याचा तयारीमध्ये असताना वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे, हवालदार राजु जगदाळे,चालक रुपेश नावडकर व हाेमगार्ड विठ्ठल चव्हाण, अश्विन बनसोडे यांनी सिंघम स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग करुन तीन दरोडेखोरांना जेरबंद केले. यामुळे दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान टळले. या कामगिरी बद्दल भारतीय जनता पार्टीच्या युचा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष भिसे, सुभाष क्षीरसागर सन्स अॅन्ड सराफ चे मालक अभिजित क्षीरसागर, व्यवस्थापक सुमित पारखे, सोमनाथ वाघमोडे,हनुमंत निंबाळकर, संजय लोखंडे, तुषार दळवी,शेकलाल घोरपडे, पांडुरंग सुळ,अमोल गलांडे, गणेश सूळ यांनी अरविंद काटे यांचा शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे व त्यांच्या सहकार्यांच्या कामगिरीचे कौतुक केले असुन त्यांना रोख रक्कमेचा रिवार्ड दिला आहे.