"बाळासाहेब या तुम्ही पुन्हा या जगात...' सांगली जिल्ह्यात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

सांगली- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सांगली-मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. सोशल मिडियावर देखील श्री. ठाकरे यांच्या आठवणींना शिवसैनिकांनी उजाळा दिला. 

सांगली- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सांगली-मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. सोशल मिडियावर देखील श्री. ठाकरे यांच्या आठवणींना शिवसैनिकांनी उजाळा दिला. 

स्टेशन चौकातील गणेश मार्केट कार्यालयात श्री. ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नितीन चौगुले, जिल्हा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष आप्पा कुलकर्णी, जिल्हा डिस्ट्रीब्युशन व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष निर्मल बोथरा, किराणा माल असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज कवठेकर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, अनिल शेटे, सुधीर चव्हाण, बंडू मोरे, परशुराम नरोटे, उदय पाटील, राहुल यमगर, प्रकाश लवटे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुख श्री. ठाकरे यांच्या आठवणींना जुन्या पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेकांनी श्री. ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सोशल मिडियावर देखील आज श्री. ठाकरे यांच्याच आठवणींना उजाळा दिला गेला. "बाळासाहेब या तुम्ही पुन्हा या जगात...' हा व्हीडिओ देखील अनेकांनी शेअर केला. तसेच अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या "डीपी' वर श्री. ठाकरे यांचे छायाचित्र ठेवून अभिवादन केले. "नाव बाळ होते..पण लोक आजही बापमाणूस म्हणून ओळखतात' अशा शब्दातही अनेकांनी श्री. ठाकरे यांना अभिवादन केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhiwadan to Shiv Sena chief in Sangli district