esakal | पारनेरमध्ये तब्बल चार हजारजण होम क्वॉरंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

About a thousand home quarantines in Parner

तब्बल सुमारे तीन हजार 967 लोकांना होमक्वॉरोंटईन केले आहे. या लोकांनी आपआपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण कक्षात थांबावे, असा सल्ला त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पारनेरमध्ये तब्बल चार हजारजण होम क्वॉरंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर - तालुक्यात परदेशवारी करून आले 21, राज्याच्या बाहेरून 197 तर  जिल्ह्याच्या बाहेरून  16 हजार 249 जण आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाने तब्बल सुमारे तीन हजार 967 लोकांना होमक्वॉरोंटईन केले आहे. या लोकांनी आपआपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण कक्षात थांबावे, असा सल्ला त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यात एक मार्च  ते 28 मार्च अखेर सुमारे 17 हजार 93 लोक तालुका , जिल्हा , राज्य  तर काही  परदेश वारी करूण आले आहेत. यात तालुक्याच्या बाहेरून आलेल्यांची संख्या अवघी 542 आहे तर जिल्हयाबाहेरून तसेच राज्य व परदेश वारी केलेल्यांची संख्या त्या मानाने मोठी आहे. या आकडेवारीत अजूनही भर पडणार आहे कारण अजूनही काही गावातील हा सर्वे करणे बाकी आहे.

तालुक्यातील अळकुटी, भाळवणी, निघोज, पळवे खुर्द, कान्हूर पठार, रूई छत्रपती व खडकवाडी अशी सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या मदतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. आज अखेर तालुक्यातील तीन हजार 967 लोकांना होमकोरोंटाईन केले आहे. त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर पडू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. मात्र, यातील कोही लोक घराबाहेर   पडताना दिसत आहे मला काहीच झाले नाही.

या भावनेतून अनेक ठिकाणी ही मंडळी जाताना आढळतात. मात्र जर कदाचित यातील एखादा व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली तर त्याचा तालुक्ाला मोठा धोका आहे.  तालुक्यातील ज्या लोकांना होमकोरोंटाईन केले आहे त्यांनी 14 दिवस आपली स्वताःची काळजी घ्यावी घराबाहेर पडू नये घरातही वेगळे थांबावे,  स्वताःचे, कुटुंबाचे व समाजाचेही रक्षण करावे.

- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी.

loading image