
केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर थांबवावा
बेळगाव : महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर थांबवावा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मोठया संख्येने जमून शिवसेना खासदार संजय राउत यांच्यासह देशभरात चुकीच्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे ही कारवाई थांबवावी आणि देशाची लोकशाही अबाधित रहावी.
केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याच्या हेतूने आणि सूडाच्या भावनेनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत असल्याचे दिसून येत असून ही बाब सदृढ लोकशाहीमध्ये योग्य नाही. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने कारवाई करण्यासाठी होत असलेल्या प्रकरणात लक्ष घालून सदर प्रकार थांबविले जावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुधा भातकांडे, भागोजी पाटील,माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, गीता हलगेकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, राजू पावले, शांताराम होसुरकर, सुनील बोकडे, किरण मोदगेकर, राजू कणेरी, राजू शहापुरकर, नितीन खन्नूकर, अरुण पोटे, वासू सामजी, विनायक कावळे, सुधीर शिरोळे, प्रशांत भातकांडे, नारायण मुचंडीकर, सिद्धार्थ चौगुले, आकाश भेकणे, ओमकार आपटेकर, अभि जाधव, महेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या मार्गाने वापर करून महाराष्ट्र सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार आपला कार्यकाळ पुरा करेल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मिलिंद देसाई
Web Title: Abuse Central Investigation System Stopped Demand Maharashtra Integration Youth Committee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..