
मिरज : सांगलीहून जतच्या दिशेला जाणाऱ्या एसटी बसला ट्रकने दिलेल्या धडकेत १८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बसचालक अर्जुन कृष्णा एरंडे (रेवेवाडी, ता. मंगळवेढा) यांनी ट्रकचालक स्वप्नील पंडितराव मुळे (भालकी, जि. नांदेड) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आज सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेल्या प्रवाशांवर मिरजेतील शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.