esakal | गोकाकजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह चिमुरडी ठार

बोलून बातमी शोधा

गोकाकजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह चिमुरडी ठार
गोकाकजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह चिमुरडी ठार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोकाक : येथून जवळच असणाऱ्या हल्लूर (ता. मुडलगी) येथे थांबलेल्या मोटारीला सिमेंट भरलेल्या टिप्परने (एम. एच. १२ एन. एच. ७०१०) धडक दिल्याने मोटारीमधील शांतव्वा भागोडी (वय ५०), दुंडव्वा उळागड्डी (वय ६०), लक्ष्मी भागोडी (वय ५) हे तिघे ठार झाले. सुनंदा भागोजी (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या. अपघातग्रस्त सर्व रा. हल्लूर (ता. मुडलगी) येथील आहेत.

हल्लूर येथील बागडी कुटुंबात घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी शेतवाडीत रात्री जाऊन स्वयंपाक करून पहाटे २.३० सुमारास घरी येत असताना मुधोळ-निपाणी रस्त्यावरील हल्लूर गुब्बी बसस्थानका समोर कारचालक वाहन थांबवून खाली उतरला. यावेळी यादवाडहून पुण्याकडे सिमेंट भरून जाणाऱ्या टिप्परने कारला जोराने धडक दिल्याने कारमधील सुनंदा या जागीच ठार झाल्या. अन्य दोघे उपचारासाठी गोकाकला नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. घटनेची मुडलगी पोलिसात नोंद झाली असून टिप्पर चालक प्रकाश भीमराव खांडेकर (वय ३५, रा. कर्वे रोड पुणे, महाराष्ट्र) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: प्रशासनाचा ढिसाळपणा उघड; कर्नाटकच्या दप्तरातून 'वल्लभगड' गेला कुठे?