esakal | प्रशासनाचा ढिसाळपणा उघड; कर्नाटकच्या दप्तरातून 'वल्लभगड' गेला कुठे?

बोलून बातमी शोधा

प्रशासनाचा ढिसाळपणा उघड; कर्नाटकच्या दप्तरातून 'वल्लभगड' गेला कुठे?
प्रशासनाचा ढिसाळपणा उघड; कर्नाटकच्या दप्तरातून 'वल्लभगड' गेला कुठे?
sakal_logo
By
आनंद शिंदे

संकेश्वर : राष्ट्रीय महामार्गाला अगदी लागूनच असलेले वल्लभगड (ता. हुक्केरी) हे ऐतिहासिक स्थळ आहे. या गावची लोकसंख्याही सुमारे तीन हजाराच्याजवळ आहे. सदर गाव हरगापूर ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. पण, अधिकृतपणे या गावाला अद्याप वेगळ्या गावाचा दर्जाच देण्यात आलेला नाही. या गावाचे अस्तित्व राहण्यासाठी वल्लभगड वेबपोर्टल समितीने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. वल्लभगडचे नाव सरकारी दप्तरासह वेबसाईटवर नोंद करण्याची मागणी त्यामध्ये केली आहे.

१९६८ च्या पंचायत कायद्यानुसार अद्याप वल्लभगडचे नाव कर्नाटकच्या दप्तरात नोंद नाही. वल्लभगड ऐतिहासिक वल्लभगड किल्ल्याच्या नावावरुन ठेवले आहे. १९४२ मध्ये गावचा उल्लेख असलेला पेपर शंकराचार्य मठ-संकेश्वर व सिद्ध संस्थान मठ-निडसोशी येथे मिळाला आहे. मुंबई व बेळगाव गॅझेटमध्येही वल्लभगडचा उल्लेख आहे.

हेही वाचा: Video - तुम्ही घेतलेला आंबा देवगड हापूसच आहे ना? फसवणुकीपासून सावधान

२०१७ मध्ये वल्लभगडचे नाव कर्नाटकच्या दप्तरात नोंदविण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पास करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तो ठराव अमान्य असल्याचे सांगितले. वल्लभगड गावात ग्रामपंचायत आहे. या पंचायतीचे नाव हरगापूर असे आहे. हरगापूर व वल्लभगड या दोन गावांत २ कि.मी.चे अंतर आहे. वल्लभगड हे हरगापूरगड असे येथील सरकार व प्रशासन म्हणत असले तरी तशीही नोंद कुठेच नाही. ग्रामपंचायत व सरकारी वेबसाईटवर हरगापूर या एकाच गावाची नोंद आहे. त्यामुळे वल्लभगड गेले कुठे? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

"वल्लभगडाला तीन हजार लोकसंख्या व पाचशेवर घरे आहेत. या वस्तीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या हरगापूर गावच्या नावाखालीच वल्लभगडचा कागदोपत्री व्यवहार सुरु आहे. या बिननावाच्या नागरी वस्तीला वल्लभगड नाव द्यावे, त्यासाठी लिखित ठरावही ग्रामपंचायतीमध्ये झाला आहे. त्याची दखल न घेतल्याने दाद मागितली आहे."

- गजानन साळुंखे, अध्यक्ष, वल्लभगड वेबपोर्टल

हेही वाचा: कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त

"वल्लभगड स्वतंत्र गावच्या अस्तित्वाबाबत रहिवाशांची मागणी रास्त आहे. त्यांच्या वस्तीला वल्लभगड नाव देण्यास संमती असून सहकार्य राहील. पंचायतीकडून त्याला आवश्‍यक ती मदत देण्याचा प्रयत्न राहील."

- पवन पाटील, अध्यक्ष, हरगापूर ग्रामपंचायत