पोलिस अधिकार्‍यानेच दिल्या सात जागी धडका; मृतदेहासह नातेवाईक पोलिसाच्या घरी...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी मारुती विभुते यांनी आटपाडी ते पिंपरी रस्त्यावर मंदधुंद अवस्थेत बेफान चारचाकी चालवून सात ठिकाणी धडक दिली.

आटपाडी - वडूज (जि. सातारा) येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी मारुती विभुते (रा.बोंबेवाडी, ता. आटपाडी) याने काल रात्री आटपाडी ते पिंपरी रस्त्यावर मंदधुंद अवस्थेत बेफान चारचाकी चालवून सात ठिकाणी धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू तर पाचजण जखमी झालेत. मयतचा भाऊ अण्‍णासो पुजारी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान आरोपीला अद्याप अटक केली नसल्यामुळे आंबेवाडी ग्रामस्थांनी मयताचे प्रेत आंबेवाडी गावात मेहून तेथून सहाय्यक पोलीस निरीक्षक विभूतीच्या गावी बोंबेवाडी ला अंत्यविधीसाठी सायंकाळी नेले होते यामुळे तणावाचे वातावरण बनले आहे.    

थांबण्याचा इशारा केला तरीही ते थांबले नाही

काल आटपाडीचा आठवडा बाजार होता. बाजारासाठी बिराजी पुजारी रा.आंबेवाडी आले होते. ते टेलरिंगचा व्यवसाय करतात. बाजार करून रात्री आठ वाजता आटपाडी ते पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गावाकडे मोटरसायकलवरून निघाले होते. याच दरम्यान समोरून आटपाडीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते स्विफ्ट डिझायर कंपनीची चार चाकी गाडी घेऊन आटपाडीकडे प्रचंड आणि बेफान वेगाने येत होती. ते मंद धुंद अवस्थेत होते. गाडीवर नियंत्रण नव्हते. त्यांची समोरून येणारी गाडी पाहून प्रत्येक जण रस्ता सोडून बाहेर जात होता. येता-येता दोन ठिकाणी गाडीने धडक दिली. देशमुखवाडी जवळ बिराजी पुजारी यांच्या मोटरसायकलीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.यावेळी ग्रामस्थांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला तरीही ते थांबले नाही. उलट आणखी वेगाने आटपाडीकडे निघून गेले. जाता जाता पाच ते सात ठिकाणी  धडक दिली .यामध्ये  पाच जखमी झालेत. बिराजी पुजारी यांना उपचारासाठी तातडीने आटपाडीत खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आंबेवाडी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रात्री साडेनऊ वाजता प्रचंड मोठी गर्दी केली. आज सकाळी मयताचे शवविच्छेदन केले.

वाचा - कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?

प्रकरण तडजोडीने मिटवण्याचा प्रयत्न

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते आणि मयत बिराजी पुजारी हे बोंबेवाडी आणि आंबेवाडी या गावचे आहेत. ही दोन्ही गावे जवळ जवळ आहेत. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी काल रात्रीच एकत्रित येऊन प्रकरण तडजोडीने मिटवण्याचा प्रयत्न चालवले होते. आज सकाळी शवविच्छेदन करून पिराजी पुजारी यांचे प्रेत बोंबेवाडी आंबेवाडी च्या गावी नेले दुपारपर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. त्यांनी बिराजी पुजारी यांचे प्रेत आंबेवाडीतून् विभूतेच्या गावी बोंबेवाडी येथे त्याच्या घरी सायंकाळी नेले होते. तेथेच अंत्यसंस्कार करण्याची तयारी ग्रामस्थांनी चालवली होती.             


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident by police officer in atpadi