भरधाव टॅंकरने मजुराला चिरडले, रिक्षालाही दिली जोराची धडक; सांगलीतील घटना

accident in sangli one person dead and one injured
accident in sangli one person dead and one injured
Updated on

सांगली : भरधाव वेगाने जाणाऱ्या इंधनाच्या टॅंकरने मजुरास चिरडून समोर असणाऱ्या रिक्षालाही जोराची धडक दिली. अपघातात राजेंद्र रामनाथ सराफ (वय ४०, खारे मळा, कुपवाड) हे जागीच ठार झाले. रिक्षाचालक अजिंक्‍य रमेश माने (बामनोली, ता. मिरज) हे जबर जखमी झाले. रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. काल रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पोपट सोपान होवाळ (वय ५०, कुपवाड) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टॅंकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, टॅंकर चालक पसार झाला आहे. पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या मृत राजेंद्र सराफ हे मजुरी करत होते. ते कुपवाड येथील खारे मळा येथे राहत होते. मंगळवारी सकाळी ते घरातून जेवणाचा डबा घेऊन फरशी फिटींगच्या कामाला जातो, असे सांगून बाहेर पडले. रात्री पावणेनऊच्या सुमारास ते पायी घरी परत जात होते. सराफ हे बालाजीनगरजवळ असलेल्या पै गार्डनजवळ आले. त्यांच्यामागून इंडियन ऑईलचा टॅंकर (एमएच १२ एचडी ९६६१) हा भरधाव वेगाने आला. टॅंकरने पायी चालत जात असलेल्या राजेंद्र सराफ यांना जोराची धडक दिली. रिक्षालाही (एमएच १० के २१३८) ठोकरले.

या अपघातात सराफ हे जागीच ठार झाले. तर रिक्षाचालक अजिंक्‍य माने हे जखमी झाले. अपघातात रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती समजल्यानंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोपट होवाळ यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com