नगरमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

या पथकांनी शहरात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच कारवाईचा धडाका लावला. राजकुमार सारसर यांना शहरातील घंटागाड्या असलेल्या दोन चालकांना मास्क नसल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांनी महापालिकेच्या दोन घंटागाडी चालतानाच दंड केला.

नगर  - शहरात मास्क न लावता फिरणार्‍या नागरिकांना पाच हजार रुपये दंड करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. तरीही शहरात उंडारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यानुसार आज शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे, या कारवाईत चक्क महापालिकेच्या घंटागाडीचालकांना दंड झाला आहे.

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात मास्क न लावता फिरणे दुकानांसमोर गर्दी करणे सोशल डिस्टन्सचे पालन न करणे दुकानदारांनीही ग्राहकांना सोशल डिस्टन्सचे पालन करायला सांगणे त्यासाठीच्या अंमलबजावणीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले होते. या निर्देशानुसार कारवाई होत नसल्यास दंड करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आज महापालिका आयुक्त मायकलवार व उपायुक्त सुनील पवार यांनी शहरात कारवाईसाठी चार पथके नियुक्त केली.

हेही वाचा - महसूलमंत्री थोरात यांची घरीच चाललीय कटिंग

या पथकात रोहिदास सातपुते, किरण फाकटकर, डॉ. नरसिंह पैठणकर, राजकुमार सारसर, राजेंद्र सामल, भांगरे, वाखारे, यांची नियुक्ती केली. या पथकाला महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही दंड  करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते.

या पथकांनी शहरात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच कारवाईचा धडाका लावला. राजकुमार सारसर यांना शहरातील घंटागाड्या असलेल्या दोन चालकांना मास्क नसल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांनी महापालिकेच्या दोन घंटागाडी चालतानाच दंड केला. याशिवाय नगर-कल्याण रस्ता व सावेडी परिसरात ही नागरिकांना तोंडाला मास्क लावल्यामुळे दंड करण्यात आला आहे.

कायद्यापुढे सगळे सारखेच
शहरात तोंडाला मास्क न लावता फिरत असलेल्या नागरिकांवर दंड करत असतानाच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक देऊ नये महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनीही तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क लावत आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दोन घंटागाडी चालकांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे.
- श्रीकांत मायकलवार, महापालिका आयुक्त, नगर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who do not use masks in Ahmednagar