esakal | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोणाकडून कापताहेत केस?
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thorat cutting

सार्वजनिक जीवनात वावरताना आपला लुक चांगला असावा याकडे अनेकांचा कटाक्ष असतो. महसुलमंत्री बाळासाहेब थोरातही या बाबतीत दक्ष असतात. मात्र कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाउनचा नियम सर्वांना सारखाच. सलून बंद असल्याने कटिंगची समस्या होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोणाकडून कापताहेत केस?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः लॉकडाउनमुळे अनेक समस्या उदभवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कटिंगची. सर्वच पार्लर बंद असल्याने घरीच केस कापावे लागते आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह सर्वच क्रिकेटपटू, अभिनेते घरीच केस कापत आहेत. त्यात आता नेतेमंडळी घरीच कटिंग करीत आहे. गावोगाव अगोदर टकलू हैवान गँग अवतरली आहे.

मागच्या आठवड्यात आमदार डॉ. सुधीर तांबे यांची कटिंग त्यांचे चिरंजीव प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत यांनी केली. सोशल मीडियात त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले.

हेही वाचा - एका बाटलीने केला घात

राज्याचे महसुलमंत्री, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सार्वजनिक जीवनात व माध्यमासमोर वावरताना आपल्या राहणीमानाची विशेष दक्षता घेतात. मंत्री थोरात यांचे अस्ताव्यस्त वाढलेले केस कट करण्याचे काम त्यांची कर्करोग तज्ज्ञ कन्या डॉ. जयश्री यांनी केले.

कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन असल्याने, जीवनावश्यक सेवा वगळता इतर उद्योगधंदे बंद आहेत. या पार्श्वभुमिवर नियमित हेअर कट करणाऱ्या अनेकांचे अवतार झाले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नाभिक कारागीर घरी बोलावण्याची सोय नाही. त्यामुळे नाईलाज कसा असतो याचा अनुभव मोठ्या शहरातच नव्हे तर राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्रामस्थांनाही येत आहे.

सार्वजनिक जीवनात वावरताना आपला लुक चांगला असावा याकडे अनेकांचा कटाक्ष असतो. महसुलमंत्री बाळासाहेब थोरातही या बाबतीत दक्ष असतात. मात्र कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाउनचा नियम सर्वांना सारखाच. 

सलून बंद असल्याने कटिंगची समस्या होती.वडिलांची अडचण ओळखून डॉक्टर कन्या जयश्री यांनी काल मुंबईत घरातच आपल्या वडिलांचा हेअर कट करुन त्यांची अडचण सोडवली. डॉ. जयश्री यांनी वडिलांच्या लूकमध्ये कुठेही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली. लेकीकडून हेअरकट करतानाचा महसूल मंत्र्यांचा फोटो सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा हेअर कट केल्याचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता कॅन्सरतज्ज्ञ म्हणून नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणारी मामे बहीण डॉ. जयश्री यांचे कौतुक केले आहे. अनेक वर्ष अभ्यास करुन वैद्यकीय ज्ञान मिळवणे व कोणताही पूर्वानुभव नसताना केस कापणे ही दोन्ही कामे सोपी नाहीत. काम कुठलेही असो मेहनत आहेच, अशी प्रतिक्रिया ते भावंडं देतात.