Krishna River Pollution : कृष्णा नदीच्या प्रदुषणासाठी जबाबदार असणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी

पाणी प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक.
Sugar Mills Polluting Krishna River
Sugar Mills Polluting Krishna Riversakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) - कृष्णा नदीचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे, मुख्यत: ही समस्या कऱ्हाड तालुक्यातील एका साखर कारखान्याच्या मळी मिश्रीत पाण्यामुळे निर्माण झाली आहे. कारखान्यांचे मळी, मोलॅसिस मिश्रित पाणी आणि कामगार कॉलनीतील शौचालयाचे मानवी मलमुत्र युक्त सांडपाणी बारमाही नदीत सोडण्यात येत आहे.

ज्यामुळे नदीचे पाणी पिण्यास योग्य राहिलेले नाही. मानवी पिण्याच्या पाण्याबरोबर प्रदूषणामुळे जलजिवांचे अस्तित्वही संपुष्टात येवू लागले असले तरी प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र गांधारी प्रमाणे डोळेझाक करून गप्प आहेत, याची कृष्णा काठच्या नागरिकात प्रचंड चीड आहे.

पाणी प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ या कायद्यांतर्गत, पर्यावरणीय प्रदूषणासाठी साखर कारखान्यास जबाबदार धरले जाऊ शकते.

तसेच जल प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ या अधिनियमांतर्गत, साखर कारखान्यास पाणी प्रदूषणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ या कायद्यांतर्गत, जैवविविधतेच्या नुकसानीसाठी साखर कारखान्यास जबाबदार धरले जाऊ शकते. तसेच ही बाब न्यायालयात गेल्यास कारखान्यावर दंडात्मक अगर कारखाना बंद ठेवण्याचे आदेशही न्यायालय देवू शकते.

हवी कायदेशीर लढाईची तयारी

केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी चर्चा घडवून आणायच्या आणि काळाच्या ओघात मागचे तेच पुढे होत राहायचे हे आता पुरे झाले. कुणीतरी या प्रश्नी लढण्यासाठी नायक म्हणून पुढे यायला हवे, साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई केल्याने कारखान्यामुळे पाणी आणि पर्यावरणीय प्रदूषण होत असेल आणि जैवविविधतेचे नुकसान होत असेल तर कारखान्यावर कारवाई करून ते बंद केले जाऊ शकतात.

तसेच दंडही आकारला जाऊ शकतो. याप्रश्नी लढणारा कुणी खमक्या योद्धा उभा राहिला पाहिजे. याबाबत प्रदुषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. जनतेने मात्र संघटितपणे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com