इचलकरंजीतील गुंड  लोहारच्या टोळीवर मोकातंर्गत कारवाई

राजेंद्र होळकर
सोमवार, 9 जुलै 2018

इचलकरंजी - येथील इचलकरंजीचा डॉन नाना उर्फ चंद्रकांत गणपती लोहार (रा.जुना चंदूर रोड, इचलकरंजी) याच्यासह त्यांच्या टोळीतील सहा जणावर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून अवघ्या तीन दिवसा‘ध्ये मंजुरी घेण्यात आली. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास कोल्हापूर शहराचे पोलीस उपाधिक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

इचलकरंजी - येथील इचलकरंजीचा डॉन नाना उर्फ चंद्रकांत गणपती लोहार (रा.जुना चंदूर रोड, इचलकरंजी) याच्यासह त्यांच्या टोळीतील सहा जणावर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून अवघ्या तीन दिवसा‘ध्ये मंजुरी घेण्यात आली. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास कोल्हापूर शहराचे पोलीस उपाधिक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 यावेळी पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरिक्षक इरगोंडा पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रज्ञा चव्हाण, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरिक्षक अमोल माळी आदी उपस्थित होते.

 श्री. घाडगे म्हणाले, ‘‘या मोकातंर्गत केलेल्या कारवाईमध्ये डॉन नाना उर्फ चंद्रकांत लोहारसह त्यांच्या टोळीतील विशाल तुकाराम लांडगे (वय २४), शितल मारुती सोलगे (वय ३१), याकुब सिंकदर मलिक (वय ३१), गुंड्या उर्फ सुनिल चंद्रशेखर गोवणकोप (वय ३७), आसिफ बशीर मुजावर (वय २३, हे पाच रा.पुजारी मळा, जुना चंदूर रोड, इचलकरंजी), मल्लेश उर्फ मल्लीनाथ विजय पालापूरे (वय २४, रा.गुरुकन्नानगर) या सहा जणाचा समावेश आहे. या सहा जणाना गेल्या आठवड्यात येथील शिवाजीनगर पोलिसानी एका गंभीर गुन्ह्यात अटक केली असून, ते सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. पण या टोळीचा म्होरक्या गुंड लोहार अद्यापी फरारी आहे. पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरु केला आहे. या गुंड लोहार यांच्याविरोधी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात १३ गंभीर गुन्हे नोंद आहेत. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा देखील झाली आहे. तर त्यांच्या साथिदार गुंड्या उर्फ सुनिल गोवणकोप यांच्या विरोधी तीन आणि मल्लेश उर्फ मल्लीनाथ पालापूरे त्यांच्याविरोधी दोन स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.

 येथील तांबे मळा परिसरात राहणाऱ्या एका परितक्ता ‘हिलेला गुंड लोहारने पोटगी मिळवून देतो, वकील माझ्या ओळखीचे आहेत. असे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून पिडीतेला दिवस गेल्याने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला लावून गर्भपात केला. त्याचबरोबर गुंड लोहारने विशाल लांडगे, शितल सोलगे, याकुब मलिक, गुंड्या उर्फ सुनिल गोवणकोप यांच्या मदतीने पिडीतेच्या घराचा दरवाजा मोडून आत प्रवेश करुन मारहाण केली. तिच्या गळ्यातील दागिणे लंपास केले. तर आरोपी  गुंड्या उर्फ सुनिल गोवणकोप, आसिफ मुजावर या दोघांनी पिडीतेच्या घरातील कपाटातील दागिणे लंपास करणारी घटना गेल्या महिन्यामध्ये घडली होती.

 याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसात संबंधीत पिडीतेने गुंड लोहारसह त्यांच्या टोळीतील सहा जणाविरोधी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. या टोळीच्या गुन्हेगारी कारनाम्याची दखल घेवून, पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरगोंडा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरिक्षक अमोल माळी आदीच्या पथकांने विशेष परिश्रम घेत अवघ्या तीन दिवसा‘ध्ये त्यांच्या विरोधी मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधिक्षक संजय मोहिते व विशेष पोलीस महानिररीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी त्वरीत मंजुरी दिली.    

पोलिसांनी या टोळीविरोधी मोकातंर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे कार्यालयामध्ये छाननी होवून आज जिल्हा पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

गुंड लोहारवर मोकातंर्गत कारवाई करणार दै.सकाळ मध्ये सर्वप्रथम वृत्त 
गुंड लोहार आणि त्याच्या टोळीच्या गुन्हेगारी कारनाम्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून या टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यातंर्गत कारवाईच्या हालचाली सुरु केल्याबाबतचे ‘दै.सकाळ‘ने २९ जून रोजी सर्वप्रथ‘ वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची या टोळीवर आज मोकातंर्गत केलेल्या कारवाईने सर्वत्र चर्चा केली जात आहे.

Web Title: Action under the criminal of Lohar gang