Loksabha 2019 : 'नोटाबंदी करून मोदींनी नागरिकांना भिकारी केले' 

श्रीनिवास दुध्याल 
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुलवामाचे भांडवल कशासाठी? 
पुलवामा येथे हल्ला झाला. त्यात अनेक जवान मारले गेले. या घटनेमागे कोणाचा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. सैनिकांच्या पत्नी विधवा बनल्या, मुले अनाथ झाली. जवानांच्या मृत्यूचे भांडवल निवडणुकीसाठी करत आहेत. तिकडे जवान हुतात्मा झाले तर पंतप्रधान शूटिंगमध्ये व्यस्त होते. काय म्हणावे अशा पंतप्रधानांना, असा सवाल विजयाशांती यांनी केला.

सोलापूर : पाच वर्षांत मोदी सरकारचा कारभार शून्य आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख टाकण्याचे आश्‍वासन दिलेल्या मोदींनी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर पैसे जमा केलेच नाहीत, उलट नोटाबंदी करून देशातील गरिबांसह श्रीमंतांनाही भिकारी बनवले, अशी टीका तेलुगु सिनेअभिनेत्री विजयाशांती यांनी केली. 

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जुने विडी घरकुल येथे रविवारी (ता. 14) सभा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, वीणा देवकते, कृष्णाहरी चिन्नी, प्रकाश कोडम, महांकाळी येलदी उपस्थित होते. 

विजयाशांती म्हणाल्या, "अनिल अंबानींना राफेल विमानांचा ठेका दिला, जनतेचा पैसा घेऊन नीरव मोदी यांनी देशातून पलायन केले. मोदी श्रीमंतांचे पंतप्रधान आहेत. खोटारडे आहेत. दोन कोटी रोजगार देणार म्हणाले मात्र, प्रत्यक्षात कोणालाच रोजगार मिळाला नाही. मोदी स्वत: तासा-तासाला पाच लाखांचे जॅकेट घालतात. टोप्या घालून फिरतात. वेड्यासारखे वागतात. देशाच्या पंतप्रधानाला हे शोभणारे आहे का? कॉंग्रेस सत्तेवर असताना सोलापुरात नळाला दररोज पाणी यायचे. आता भाजप सत्तेत आहे, तर पाच-सहा दिवसांनी पाणी येते. नोटाबंदीमुळे विडी कामगारांना आर्थिक त्रास सोसावा लागला. 

पुलवामाचे भांडवल कशासाठी? 
पुलवामा येथे हल्ला झाला. त्यात अनेक जवान मारले गेले. या घटनेमागे कोणाचा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. सैनिकांच्या पत्नी विधवा बनल्या, मुले अनाथ झाली. जवानांच्या मृत्यूचे भांडवल निवडणुकीसाठी करत आहेत. तिकडे जवान हुतात्मा झाले तर पंतप्रधान शूटिंगमध्ये व्यस्त होते. काय म्हणावे अशा पंतप्रधानांना, असा सवाल विजयाशांती यांनी केला.

Web Title: actress vijayashanti criticize Narendra Modi on demonetization