Aadi Woman Samruddhi Magdum Dies
esakal
आडी (जि. बेळगाव) : घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार, चिमुकल्या पावलांनी संसार फुलणार, या आनंदात असलेल्या मगदूम कुटुंबावर नियतीने घाला घातला. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या समृद्धी अमर मगदूम (रा. आडी, ता. निपाणी) यांचा प्रसूतीदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे मृत्यू (Samruddhi Magdum Death) झाला. सोमवारी रात्री त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही तासांतच आईची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरल्याने आडी गावावर शोककळा पसरली आहे.