इथे होते दुधात भेसळ...

adlturation in milk find in sangali district
adlturation in milk find in sangali district

सलगरे : कर्नाटक सिमाभागातील अरळीहट्टी मोठ्या प्रमाणात दूधभेसळीचे प्रकार उघडकीस आला आहे. अथणी पोलीसांनी भेसळयुक्त दूध केंद्रावर धाडी टाकून भेसळयुक्त दूध व साहित्य जप्त करणेत आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सलगरेपासून कर्नाटक सिमारेषेवर असणाऱ्या अरळीहट्टी या गावातील एका दूध डेअरी मध्ये शरीराला घातक ठरणारी रसायने व पामतेल दूधात मिसळून त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अथणी पोलीसांना मिळाली. अथणीचे पोलिस निरीक्षक शंकरगौडा पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भेसळ करणाऱ्या साईदत्ता नामक डेअरीवर गेल्या आठवड्यात सकाळी आठ वाजता छापा टाकून भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. व भेसळ करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरारी आहे.

यावेळी पोलीसांना भेसळयुक्त दूधाचे पाच कॅन, 9 किलो पामतेल, 3रिकामे कॅन, मिक्‍सर ग्रॅंण्डर व शरीराला घातक असणारी लॅंक्‍टोस नावाची 10 किलो पावडर जप्त केली आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, अथणी तालुका पोलिस उपअधिक्षक एस.व्ही गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकरगौडा पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी गणपती कडबगावी, ए एस.आय. के. एस.सनदी,

के.आर.गुडाज,एम.बी.दोडमणी,टी.एम.नागराळ,एम.डी.हिरेमठ,बी.जे.तलवार,एस.ए.कब्बूर,आर.सी.हादीमनी या पोलीस कर्मचाऱ्यांनी दूधभेसळ कारवाईत सहभागी घेतला होता. 

दूधाची महाराष्ट्रात विक्री 
कर्नाटक सिमाभागातील अनेक छोट्यामोठया गावातून वाड्या-वस्तीवरील मोठ्या प्रमाणात दूध गोळा करुन ते मोठ्या चिलिंग सेंटरमध्ये साठविले जाते व टॅंकरद्वारे ते महाराष्ट्रात विक्रीसाठी किंवा दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी पाठविले जात आहे. दररोज एक दोन टॅंकर दूध महाराष्ट्रात जात असल्याने या निर्यात होणाऱ्या दूधाची तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. दूधभेसळीच्या प्रकारांमुळे किती जणांना दूध म्हणून विषाची परीक्षा घ्यावी लागत आहे. या भेसळीचा फटका लहान मुले, रुग्ण आणि सर्वसामान्य लोकांना बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही दूधभेसळीचे कनेक्‍शन आहेका?याची चौकशी करण्याची गरज असल्याचे या छाप्यावरुन दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com