सांगलीत किसान क्रेडिट कार्ड योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  

विष्णू मोहिते 
Tuesday, 1 September 2020

सांगली जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड योजनेकडे प्रशासनानेच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनासमोर कोरोना शिवाय सध्या तरी अन्य विषयांकडे दुर्लक्ष आहे. 

सांगली : विविध व्यवसायिकांसाठी तीन लाख रुपये सलवतीत कर्ज देण्यासाठी राज्य सरकारने जुलै अखेर अर्ज मागवले होते. कोल्हापूर जिल्हा बॅंकेसह राज्यातील काही व्यवसायिकांना प्रत्यक्षात योजनेचा लाभ मिळतो आहे. सांगली जिल्ह्यात मात्र ही योजनेकडे प्रशासनानेच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनासमोर कोरोना शिवाय सध्या तरी अन्य विषयांकडे दुर्लक्ष आहे. 

पशुसंवर्धन व्यवसायाकरिता कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन व दुग्ध व्यवसायातील विविध खर्च भागविण्यासाठी खेळते भांडवल आवश्‍यक असते. या खर्चाकरिता व पशुपालकांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना किसान कार्डाद्वारे कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान कार्ड देण्याची ही योजना आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गेल्या महिन्यांपासून योजना सुरु केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छ व्यवसायिकांसाठीही या योजनेतून कर्ज देण्यास सुरुवात झालेली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंक, व्यापारी बॅंक तसेच ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत. अनेक जिल्ह्यात त्याचे वाजत-गाजत स्वागतही होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी बॅंक, ग्रामीण बॅंक, पशुसंवर्धन विभाग, कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याकडे याबाबतची सविस्तर माहिती जुलै अखेर कळवली आहे. जे काही शेतकरी माहिती कळवायचे राहिले आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी देण्याची गरज आहे. किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध झाल्यास पशुसंवर्धन, मत्स, दूग्ध, शेळी-मेंढी पालन आदी व्यवसायाकरिता खेळते भांडवल मिळणार आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration neglects Sangli Kisan Credit Card Scheme