२८ दिवसांनंतर या बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

येथे तीन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे अठ्ठावीस दिवसांपासून बंद मांगले मुख्य बाजार पेठेने आज मोकळा श्वास घेतला.

मांगले (जि. सांगली) ः येथे तीन कोरोना रुग्ण सापडल्यामुळे अठ्ठावीस दिवसांपासून बंद मुख्य बाजार पेठेने आज मोकळा श्वास घेतला.

मुख्य बाजार पेठेत वेशीजवळील आणि मारुती मंदिरासमोरील पत्रे आणि चिवकाट्यांचे अडथळे सकाळी अकारा वाजता तलाठी सुभाष बागडी, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्या परवानगीने काढले. यापूर्वी ग्रामपंचायत व मांगले विकास सोसायटीजवळचे अडथळे काढून गल्ल्यांतून लोकांना ये-जा करण्याची सोय करून देण्यात आली होती. 

आज सकाळी 11 वाजता अडथळे दूर केल्यानंतर व्यापा-यांनी दुकाने सुरु केली. 28 दिवसांपासून बाजारपेठ निर्मनुष्य होती. दुकाने सुरु झाल्यामुळे लोक खरेदीसाठी आले. मास्क व सोशल डिस्टन्सनसह व्यवहार झाले.  कंटेन्टमेंट झोन सोडून इतर भागातील बंद दुकानेही आज सुरु करण्यात आली. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला व शेतीउपयोगी साहित्याची विक्री सुरु झाली. दरम्यान, शेतकरी अंतरमशागतीत व्यस्त आहेत. सकाळी शेतात गेलेले लोक सायंकाळी घरी येतात.

दुकानांची वेळ सकाळी 9 ते 3 ऐवजी 9 ते 5 करावी, अशी मागणी होत आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून व मास्कसह फिरावे. ग्राहकांना मास्कशिवाय येण्यास मनाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 28 days Mangale- Sangali market opeens