बेळगाव : पालकमंत्र्याचा तिढा कधी सुटणार ? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही 'सस्पेन्स' कायम

after CM visit belgaum post of guardian minister problem not solved
after CM visit belgaum post of guardian minister problem not solved
Updated on

बेळगाव : वादग्रस्त सिडी प्रकरणामुळे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने बेळगावचे पालकमंत्री पद एक महिन्यापासून रिक्त आहे. मात्र, या पदावर अद्याप कुणाची वर्णी लावण्यात आलेली नाही. सध्या लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, पालकमंत्र्यांशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना भाजपला कसरत करावी लागत आहे. 

रमेश जारकीहोळी यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा आहे. बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याची तयारी पक्षाने केली होती. परंतु, वादग्रस्त सिडी प्रकरणामुळे सगळेच फासे उलटे फडले आहेत. जिल्ह्यातील अन्य मंत्र्यांची पालकमंत्रीपदी निवड करण्याची तयारीही करण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्र्यांची निवड करतील. बेळगाव दौऱ्यात ही निवड जाहीर होईल, अशी चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री मंगळवारी (30) बेळगावात येऊन गेले. मात्र, त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत मौनच बाळगले. त्यामुळे, पालकमंत्रीपदाचा 'सस्पेन्स' कायम राहिला आहे. 

पालकमंत्री होण्यास जिल्ह्यातील अनेक प्रभावी नेते इच्छूक आहेत. काहींनी याबाबत भाष्यही केले आहे. त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री व अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची नावे आघाडीवर आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीमुळे यापैकी एकाच्या गळ्यात पालकमंत्र्यांची माळ घालण्यात येईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अजूनही घोषणा करण्यात आली नसल्याने भाजप पालकमंत्र्यांशिवायच पोटनिवडणूक लढविणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com