esakal | हळदीपाठोपाठ याच्याही ऑनलाईन सौद्यांची मागणी

बोलून बातमी शोधा

After turmeric powder demand for raisins occasion

सांगली जिल्ह्यात सुमारे एक लाख टन बेदाणा निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. सोलापूर, विजापूर जिल्ह्यात मिळून सुमारे 90 हजार ते एक लाख टन बेदाणा निर्मितीचा अंदाज आहे.

हळदीपाठोपाठ याच्याही ऑनलाईन सौद्यांची मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सध्या कोरोनामुळे बेदाणा सौदे बंद आहेत. त्याचा गैरफायदा काही कोल्ड स्टोअरेज मालक घेत आहेत. खासगी खरेदी विक्री करून शेतकऱ्याची लूट सुरू केली आहे. ते थांबवावे. हळद सौद्याच्या धर्तीवर बेदाणा ऑनलाईन सौदे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. 

श्री. खराडे यांनी मांडलेली भूमिका अशी : जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा कोरोनामुळे शेवटच्या टप्प्यात द्राक्षाची विक्री झाली नाही. लॉकडाउनमुळे द्राक्ष विक्रीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मिती करण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्यात सुमारे एक लाख टन बेदाणा निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सोलापूर, विजापूर जिल्ह्यात मिळून सुमारे 90 हजार ते एक लाख टन बेदाणा निर्मितीचा अंदाज आहे. दरवर्षी पेक्षा बेदाणा निर्मिती मध्ये थोडी वाढ झाली आहे. 
सांगली जिल्ह्यात 75 ते 80 कोल्ड स्टोरेज आहेत. सर्व स्टोअरेज भरत आली आहेत. सध्या सौदे बंद असल्याने काही स्टोअरेज मालक शेतकऱ्याच्या बेदाण्याची चोरून खरेदी करून लूट करत आहेत. यामुळे अडत सेस ही बुडतो आहे. शिवाय खासगी खरेदी विक्री सुरू असताना अडत कमिशन घेणे चूक आहे. तरीही काही जण वटाव आणि कमिशनही कट करून घेत आहेत. अगोदरच शेतकरी अडचणीत त्यात कोल्ड स्टोअरेज मालकाकडून लूट असे प्रकार सुरू आहेत. 
शेतकऱ्याची आर्थिक निकड लक्षात घेऊन जर कोल्डस्टोअरेज मालक, काही व्यापारी लुटत असतील तर हे थांबवण्यासाठी ऑनलाईन सौदे सुरू करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा. जिल्हा प्रशासनाने त्याला मान्यता द्यावी. ऑनलाईन सौदे सुरू करणे अडचणीचे असले तरी काही शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ही अडचण दूर करणे आवश्‍यक आहे. 

बेदाणा उत्पादकांनी घाई करू नये 
महेश खराडे म्हणाले, "सध्या कोरोनामुळे देशा अंतर्गत मार्केट, निर्यात बंद आहे, पण परिस्थिती निवळल्यानंतर भारतीय बेदाण्याला चांगले मार्केट राहण्याची शक्‍यता आहे. चीन, इराण, अफगाणिस्थान आदी देशांतील बेदाणा यावर्षी स्पर्धेत असण्याची शक्‍यता कमी आहे, त्यामुळे बेदाणा विक्री करण्याची घाई करू नये.''