भाजपला इशारा ; पहिला संविधान संरक्षण मार्च सांगलीतून...

against CAA NRC and NPR Sangli march news
against CAA NRC and NPR Sangli march news
Updated on

सांगली - सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायदा आणून संविधान मोडीत काढणाऱ्या भाजपला इशारा देण्यासाठी पहिला संविधान संरक्षण मार्च 25 रोजी सांगलीतून निघेल. स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण सातारा म्हणजे काय होता? याची आठवण करून देणारा हा मार्च असेल. त्यातून सांगली जिल्हा एकत्र येऊन नवविचारांचे वादळ निर्माण करण्याचा निर्धार आज संयुक्त बैठकीत करण्यात आला.

सांगलीत 25 रोजी सर्वपक्षीय वादळ उठणार

संविधान संरक्षण मार्च साठी आज कष्टकऱ्यांची दौलत येथे विविध राजकीयपक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निमंत्रक अरूण लाड होते. तसेच आमदार मोहनराव कदम, बाबुराव गुरव, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शैलजा पाटील, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, कॉ. शंकर पुजारी, मनिषा रोटे, ऍड. के.डी. शिंदे, रमेश सहस्त्रबुद्धे, डॉ.
संजय पाटील, सुभाष दगडे, धनाजी गुरव, व्ही.वाय. पाटील, मन्नान शेख, नितीन गोंधळे, नामदेव करगणे, सदाशिव मगदूम, सुरेश दुधगावकर, नगरसेवक मनोज सरगर,
प्रमोद सारनाथ, विजयकुमार जोखे आदी उपस्थित होते.

सीएए, एनआरसी, एनपीआर कायदा केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी सांगलीत 25 रोजी संविधान संरक्षण मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा आणला जात आहे. धार्मिक भेदभाव करणाऱ्या आणि संविधान मोडीत काढणाऱ्या कायद्याला बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला. ज्यांना संविधान बदलायचे त्यांना दक्षिण सातारा म्हणजे काय ? याची आठवण करून देणारा मार्च सांगलीत आयोजित केला जाईल. महाराष्ट्रात हा कायदा लागू केला जाऊ नये असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर करावे. केरळ, छत्तीसगड हे कायदे घटनेच्याविरोधात असल्यामुळे याचिका दाखल केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील विरोध करावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. धर्मनिरपेक्ष संघटना आणि पक्षांनी मार्चमध्ये मोठ्या संख्येने एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आले.

असा होईल मोर्चा

25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मार्च ला सुरवात होईल. तेथून सिव्हील हॉस्पिटलमार्गे बसस्थानकावर आल्यानंतर डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी पुतळा येथून महापालिकेसमोर स्टेशन चौकात मार्च आल्यानंतर सभेत रूपांतर होईल. "आम्ही भारताचे लोक' अशा बॅनरखाली फक्त राष्ट्रध्वजाखाली सर्वजण एकत्र येऊन संविधान न बदलण्याचा निर्धार करतील.

मोर्चामध्ये यांचा सहभाग 

भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, माजी खासदार राजू शेट्टी, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, आमदार सुमन पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंग नाईक, वैभव नायकवडी
आदींना मार्चसाठी निमंत्रित केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com