पोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व सरकारचे व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हालगीनाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, दामाजी मोरे, बलभीम माळी, रियाज मुजावर, पप्पू दत्तू, दत्तात्रेय वरपे, मधुकर कोंडूभैरी, सुहास कलुबरमे, अमोल माळी,  असिफ तांबोळी, आबासो सावंजी, सिद्धू नागणे, बिरुदेव ढेकळे, महेश दत्तू, अनिल रणदिवे,  आनंद पाटील, येताळा खरबडे ,पाराप्पा ढावरे, आप्पा जाधव,  सदाशिव वाघमोडे, अतुल माळी, समाधान सलगर, रामचंद्र निंबाळकर, करण सोलंकर, माऊली भांगिरे त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मृतदेह सापडल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. यात वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनातून पोलीस तपासा विषयीची निष्क्रीयता समोर आली. पोलिसांकडून तपास सुरू आहे ऐवढेच ऐकण्यात येते पण आरोपी ताब्यात घेतल्याचे अजिबात जाहीर केले नाही. त्यामुळे या संघटनेबरोबर भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सीआयडीकडे तपास देण्याची मागणी केली.

या धरणे आंदोलनास यामध्ये विविध संघटना व पक्ष यांचा पाठींबा असून यात राष्ट्रीय युवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गट ,भारत मुक्ती मोर्चा, जी.एम. गृप, वाघमारे सोलापूर, संभाजी ब्रिगेड, आरपीआय मराठा आघाडी, भारिप बहुजन महासंघ, भीम आर्मी सोलापूर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, अखिल भारतीय छावा संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डॉक्टर रा. सु. गवई गट, शिव बुद्ध प्रतिष्ठान संघटना महिला, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बखर व खाटीक संघटना, त्याचबरोबर शिवसेना अशा विविध पक्षांनी पाठींबा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against police due to Passive investigation