म्हैसाळ पाण्यासाठीच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

गुरूदेव स्वामी 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

आ. सावंत भेटीने जलसंपदामंत्र्यांनी वेगाने सुत्रे हलवित म्हैसाळ योजनेचे अधिक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांना दूरध्वनीवरून आंदोलन स्थळी भेट देऊन पाणी सोडण्याबाबतचे आदेश दिले.

भोसे : म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावातील आंदोलनात सावंत परिवाराने भाग घेतल्यामुळे याची तीव्रता वाढली असून आ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन वरिष्ठ स्तरावरून या विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत घटनास्थळी जाऊन आंदोलक व शेतकरी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या.

आ. सावंत भेटीने जलसंपदामंत्र्यांनी वेगाने सुत्रे हलवित म्हैसाळ योजनेचे अधिक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांना दूरध्वनीवरून आंदोलन स्थळी भेट देऊन पाणी सोडण्याबाबतचे आदेश दिले. त्यानंतर गुणाले यांनीही आदेश मान्य करत शनिवारी आपण स्वत: आंदोलकांची भेट घेणार असल्याचे सांगितले व पाणी सोडण्याबाबत लवकरात लवकर काय करता येईल, याविषयीचा अहवाल तयार करून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. या भागातील पाण्यासाठी गेल्या चार दिवसापासून तलावात आंदोलन करत असलेल्या झेडपी सदस्या शैला गोडसे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेची अख्खी फौजच उभी राहिल्याचे दिसून आले.आता पर्यंत शेतकरी, महिला, विविध सामाजिक संघटना यांनी सक्रीय पाठींबा दर्शविला. पाचव्या दिवशी प्रशासन कोणतेही ठोस धोरण अवलंबत नसल्याने शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी आंदोलनस्थळी ठाण मांडले. सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील काही शेतकय्रांनीना घेऊन सांगली येथे अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठाण मांडून होते. प्रश्न सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी शिवसेनेचे समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, अनिल सावंत, आप्पासाहेब माने, सुधीर अभंगराव, रवींद्र मुळे, नारायण गोवे, शंकर भगरे, आबा खांडेकर, नवनाथ गावडे, सुरेश नरळे, विठ्ठल आसबे, बाळू काशीद, हनुमंत घुमरे, दयानंद ढावरे आदी उपस्थित होते.

Web Title: agitation for mhaisal water