esakal | VIDEO: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी...वादळी पावसाने साडेपाचशे  घरं पडली, दोघांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmadnagar district receives major damage due to rain

नगर तालुक्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झालं. माळरानावर ओहळ वाहत होते. नदी-नाल्यांनाही पाणी आलं. हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे या पावसाने नुकसान केलं. सध्या काहीजणांनी कलिंगडाचे पीक घेतलं आहे. त्यालाही फटका बसला.

VIDEO: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी...वादळी पावसाने साडेपाचशे  घरं पडली, दोघांचा बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी... या काव्यपंक्ती शेतकऱ्यांच्या तोंडून आपसूक निघत आहेत. कारण वादळी पावसाने शेतकऱ्यांची वाट लावली आहे. पिकांचं नुकसान तर झालं. परंतु शेतकऱ्यांना जीवही गमवावा लागला. श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, नगर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. नगर शहरातही काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

नगर तालुक्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झालं. माळरानावर ओहळ वाहत होते. नदी-नाल्यांनाही पाणी आलं. हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे या पावसाने नुकसान केलं. सध्या काहीजणांनी कलिंगडाचे पीक घेतलं आहे. त्यालाही फटका बसला.

वादळी पावसाने पाचशे बेचाळीस घरांची पडझड झाली. साडेतीन हजार हेक्‍टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले. तालुक्‍यातील करंजी, मिरी, कोरडगाव, पाथर्डी, तिसगाव, माणिकदौंडी परिसरात पिकांचे जास्त नुकसान झाले. त्यात दोघांचा मृत्यूही झाला आहे.

पडलेली घरे व नुकसान झालेल्यांची पंचनामे करावेत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश आमदार मोनिका राजळे यांनी दिले आहेत.

तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात शनिवारी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, नायब तहसीलदार पंकज नेवसे उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, की अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस व वादळाने फळपिकांचे व पडलेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक हे फळपिकांचे शेतात जाऊन पंचनामे करावेत. तालुक्‍यात आडगाव (खंडू लोंढे) व सोनोशी (कलाबाई दौंड) येथील मृतांच्या वारसांना सरकारी मदत द्यावी. 

loading image
go to top