esakal | नगरची जिल्हा बँक उदार झाली...

बोलून बातमी शोधा

Adcc bank.jpg

आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बॅंक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला गौरविण्यात आले आहे. बॅंकेने सामाजिक जाणीव ठेवून अडचणीच्या काळात नेहमीच राज्य सरकारला भरीव मदत केली आहे.

नगरची जिल्हा बँक उदार झाली...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत जिल्हा सहकारी बॅंकेने आज 25 लाख रुपये मदतीचा धनादेश जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सुपूर्द केला. 
आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बॅंक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला गौरविण्यात आले आहे. बॅंकेने सामाजिक जाणीव ठेवून अडचणीच्या काळात नेहमीच राज्य सरकारला भरीव मदत केली आहे.

जिल्हा बॅंक व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार, अशा एकूण 25 लाखांच्या मदतीचा धनादेश जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बॅंकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले, संचालक रावसाहेब शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील आदी उपस्थित होते. 

नगरच्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती राज्यातील इत जिल्हा बँकांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या पगाराव्यतिरिक्त बँकेने अधिक मदत करणे गरजेचे होतं. कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापून त्यात जुजबी रक्कम टाकून २५ लाखांचा निधी दिला.