esakal | छात्रसैनिकांसाठी कोल्हापुरात एअर हब
sakal

बोलून बातमी शोधा

छात्रसैनिकांसाठी कोल्हापुरात एअर हब

कोल्हापूर - महाराष्ट्रात दोन ते तीन नवीन एनसीसी बटालियन स्थापन करणार असून, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. एनसीसी छात्रसैनिकांना फ्लाइंग ट्रेनिंग देण्यासाठी कोल्हापूर एअर हब बनवायचे आहे, अशी माहिती मुंबई येथील एनसीसी महाराष्ट्र निदेशालयाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील एनसीसी भवनला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छात्रसैनिकांसाठी कोल्हापुरात एअर हब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाराष्ट्रात दोन ते तीन नवीन एनसीसी बटालियन स्थापन करणार असून, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. एनसीसी छात्रसैनिकांना फ्लाइंग ट्रेनिंग देण्यासाठी कोल्हापूर एअर हब बनवायचे आहे, अशी माहिती मुंबई येथील एनसीसी महाराष्ट्र निदेशालयाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील एनसीसी भवनला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापुरात महापुराने थैमान घातले होते. शहरातील काही भागांत पुराचे पाणी शिरले होते. अनेक लोक घरांमध्ये अडकले होते. या गंभीर पूरस्थितीत एनसीसी छात्रसैनिक व जवानांनी पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम केले. त्याची दखल श्री. प्रसाद यांनी घेतली. त्यांनी एनसीसी भवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात छात्रसैनिक व जवानांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना एनसीसीच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात विचारणा केली.

ते म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी नेतृत्व करण्याची गरज असते, तेथे छात्रसैनिकांनी ते करावे, हे एनसीसीतून शिकवले जाते. कोल्हापूरच्या महापुरात छात्रसैनिकांनी आदेशाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने हे काम मोठ्या हिमतीने केले. त्याचा आम्हाला आनंद आहे. एनसीसीच्या भविष्यातील वाटचालीबाबत विचाराल, तर दोन ते तीन ठिकाणी बटालियन सुरू करणार आहोत. प्रत्येक बटालियनमध्ये दोन ते तीन हजार छात्रसैनिकांना प्रशिक्षण घेता येणार आहे. कोल्हापुरात बटालियन सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. कोल्हापूर एव्हिऐशन हब बनविण्याचा विचार आहे. तसेच सहा व्हायरस एअरक्राफ्टस येथे आम्हाला पार्क करायची आहेत. एअर हब बनवून येथे फ्लाइंग ट्रेनिंग द्यायचे आहे.’’

छात्रसैनिकांना फायदा
नागपूर, पुणे, मुंबईला एअर विंग आहे. आर्मी व नेव्ही विंग कोल्हापुरात आहे. एअर विंगसाठी कोल्हापूर एनसीसी भवनतर्फे पाठपुरावा करण्यात येत होता. आता एअर विंग येथे सुरू होत असल्याने त्याचा फायदा छात्रसैनिकांना होईल.

loading image
go to top