Vidhan Sabha 2019 : कलम 370 अणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचा काय संबंध : अजित पवार

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

विराेधकांचे सर्वच मंत्री हे 370 हटविले या जम्मू काश्मीरच्या मुद्द्याचा प्रचार करत आहेत. या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध काय? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

मंगळवेढा : येथाल शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी देखील वाढत आहे. अशा मुद्द्यांवर बाेलण्यापेक्षा विराेधकांचे सर्वत मंत्री हे 370 हटविले या जम्मू काश्मीरच्या मुद्द्याचा प्रचार करत आहेत. या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध काय? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भालके यांच्या प्रचारासाठी आठवडा बाजारात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी बळीराम साठे, उमेश पाटील, राजूबापू पाटील, दिलीप धोत्रे, चंद्रकांत घुले, तानाजी काकडे, राहुल सावंजी, दादा टाकणे, संकेत खटके, सचिन शिंदे, चंकी खवतोडे, रामचंद्र वाकडे, अनिता नागणे, सुरेश कोळेकर, लतीफ तांबोळी, पांडूरंग चौगुले, पी. बी. पाटील, भारत बेदरे, प्रज्वल शिंद आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, युती सरकारच्या 5 वर्षाच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला आहे. या सरकारमधील कृषीमंत्री कोण हे काेणालाही माहित नाही. यांच्या काळात शेतकऱ्याला संपावर जाण्याची वेळ येत आहे.

नियम लावून कर्जमाफी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी कशी करायची हे पवार साहेबांना विचारा असेही अजित पवार म्हणाले. शेतकरी हितासाठी पवार साहेब 79 वर्षी महाराष्ट्र फिरत असून युवकांचा प्रतिसाद जोरदार मिळत आहे.  नव्या दमाच्या तरुणांच्या जोरावर व पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची वाटचाल सुरू असून, जे राष्ट्रवादी संपवू म्हणणारे आहेत तेच थाेड्याच दिवसात संपतील पण पक्ष संपणार नाही. यावेळी आमदार भालके यांचेही भाषण झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Criticizes on Cm Devendra Fadnavis and bjp policy