राज्यात लोकशाही आहे,अलटीमेटमची भाषा खपवून घेतली जाणार नाही-अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar on raj thackeray All are equal before the law No dictatorship sangli

राज्यात लोकशाही आहे,अलटीमेटमची भाषा खपवून घेतली जाणार नाही - अजित पवार

इस्लामपूर : राज्यात कायद्यासमोर सगळे समान आहेत. इथे हुकूमशाही नाही, चुकीच्या वागण्यावर कारवाई केली जाईल. कुणी जातीय तेढ निर्माण करत असेल आणि अलटीमेटमची भाषा करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला. येथील लोकनेते राजारामबापू पाटील २४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेच्या उदघाटन समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "काही जण विनाकारण जातीय तेढ निर्माण करत आहेत.

त्यांना असे वागण्याने सवंग आणि फुकटात प्रसिद्धी मिळत आहे. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धास्थाने असतात, कुणी कुणाला मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना अयोध्येला जाण्यावरून इतका बोभाटा कशासाठी सुरू आहे? ते चुकीचे वागले तर कायद्याने कारवाई होणारच. सबंधित यंत्रणेला तशा कडक सूचना दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी बंधने पाळली पाहिजेत, यात सर्वांचे हित आहे. सत्तेचा ताम्रपट कुणी घेऊन आलेले नाही, हे सत्य आहे. त्याच्यामागे ताकद आहे तो मुख्यमंत्री होतो. त्यावर बोलण्यात अर्थ नाही. पण कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, यासाठी यंत्रणा सतर्क ठेवली आहे."

ते म्हणाले, "कोल्हापूर चे महाराज स्वतंत्र पक्ष काढण्याची माहिती खोटी आहे. त्यांनी तसे स्पष्ट म्हटलेले नाही. पक्ष काढणे आणि चालवणे एवढे सोपे नाही. 12 तारखेला ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत, तेव्हा स्पष्ट होईल. महाविकास आघाडी बाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय वक्तव्य करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, ते काय बोलले हे मला पूर्ण माहिती नाही, मुंबईत गेल्यावर स्पष्ट समजेल. राज्यस्तरावर निर्णय घेताना सोनिया गांधी आणि शरद पवार हे निर्णय घेतील." ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुकांवर बोलताना ते म्हणाले, "सुप्रिम कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशांचे पालन करावेच लागेल."

Web Title: Ajit Pawar On Raj Thackeray All Are Equal Before The Law No Dictatorship Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top