अखिलेश कुमार सिंह नगरचे नवे पोलिस अधीक्षक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

नव्याने बदलून आलेले अखिलेश कुमार सिंह हे मुंबई येथील परिमंडळ सातमध्ये पोलीस उपायुक्त होते. त्यांच्या बदलीचा आदेश राज्य शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने रात्री उशिरा काढण्यात आला.

नगर - जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी अखिलेश कुमार सिंह हे बदलून आले आहेत. सागर पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे बदलून गेल्यापाहून पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सागर पाटील हे पाहत होते. गेल्या चार महिन्यांपासून हे रिक्त होते.

नव्याने बदलून आलेले अखिलेश कुमार सिंह हे मुंबई येथील परिमंडळ सातमध्ये पोलीस उपायुक्त होते. त्यांच्या बदलीचा आदेश राज्य शासनाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने रात्री उशिरा काढण्यात आला.

सिंह यांच्यासोबतच अभिषेक त्रिमुखे यांचीही बदली झाली आहे. ते सहायक महानिरीक्षक म्हणून कार्यभार पाहत होते. आता ते मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त असतील. दोघांनाही तात्काळी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. परदेशी नागरिकांमुळे जिल्ह्यातील लोकांना बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशसानावर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. पोलीस अधीक्षक पदाचा सागर पाटील यांनी सक्षमपणे कार्यभार सांभाळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhilesh Kumar Singh Ahmednagars new Superintendent of Police