सांगली : अक्षय्य तृतीया देणार बाजाराला बूस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अक्षय्य तृतीया

सांगली : अक्षय्य तृतीया देणार बाजाराला बूस्टर

सांगली: साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया सण उद्या (ता. ३) आहे. पुरणपोळी, आमरसाचे जेवण आणि खास खरेदी, विशेषतः सोने खरेदीसाठी हा सण महत्त्‍वाचा मानला जातो. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले, असे मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.

या मुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. आपल्याकडे हा दिवस खरेदीचा धमाका म्हणून विशेष लक्षात राहतो. सोने-चांदी खरेदीचा धडाका लागतो. वाहन, जमीन, प्लॉट, फ्लॅट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात रेलचेल असते. या दिवशी आंब्याचा दर उच्चांकी राहतो.

Web Title: Akshaya Tritiya Sangli Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top