'कश्मीर के लिये जान भी दे देंगे' : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आला. सोमवारी जेव्हा यासंदर्भातला प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेला तेव्हा जसा गदारोळ झाला तसाच काहीसा प्रकार लोकसभेतही पाहण्यास मिळाला. काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात या मुद्द्यावरुन जुंपल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली : आमच्यासाठी काश्मीरसाठी संसदच सर्वोच्च आहे. काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. यावेळ त्यांनी 'काश्मीर के लिये जान भी दे देंगे' असं म्हणत गर्जना केली.

कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आला. सोमवारी जेव्हा यासंदर्भातला प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेला तेव्हा जसा गदारोळ झाला तसाच काहीसा प्रकार लोकसभेतही पाहण्यास मिळाला. काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात या मुद्द्यावरुन जुंपल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर आरोप केल्यानंतर अमित शहा म्हणाले, की मी जेव्हा जम्मू-काश्मीर असे म्हणतो तेव्हा पाकव्याप्त काश्मीर हा त्याचाच भाग आहे असे अभिप्रेत असते. जम्मू काश्मीरच्या सीमांमध्ये मी पाकव्याप्त काश्मीर आणि सियाचीन हे दोन्ही भाग समाविष्ट केलेले असतात. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचाच भाग आहे तो मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावू. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदच सर्वोच्च आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah gets aggressive in loksabha on jammu kashmir issue