esakal | 'सरदार' अमितभाई शहांचे बॅनर अखेर हटवले...
sakal

बोलून बातमी शोधा

'सरदार' अमितभाई शहांचे बॅनर अखेर हटवले...

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे सोलापूरमध्ये स्वागतासाठी लावलेले बॅनर अखेर हटविण्यात आले आहेत. नो डिजिटल झोनमध्ये हे बॅनर लावलेले असल्याने हटविण्यात आले आहेत.

'सरदार' अमितभाई शहांचे बॅनर अखेर हटवले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे सोलापूरमध्ये स्वागतासाठी लावलेले बॅनर अखेर हटविण्यात आले आहेत. नो डिजिटल झोनमध्ये हे बॅनर लावलेले असल्याने हटविण्यात आले आहेत.

अमित शहांचा सरदार अमित शाह असा उल्लेख असलेल्यानेही चर्चांनाही उधाण आले होते. 'सरदार' ही उपाधी देशाचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांना दिलेली आहे. एका पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्यांनी ही उपाधी दिली असल्यानेही सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली होती. हे डिजिटल बॅनर अखेर महापालिकेकडून काढण्यात आले. 

हे बॅनरनाट्य कालपासून सोलापूरमध्ये पाहायला मिळत होतं. याबाबत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top