
Sangli Farmer Child Death : सांगली जिल्ह्यातील मल्लाळ (ता. जत) येथे शेततलावाजवळ खेळत असताना पाय घसरून एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला, तर तिच्या लहान भावाला वाचविण्यात यश आले. श्रावणी दीपक माने असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून तिचा लहान भाऊ आदित्य (वय ५ वर्षे) याला परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाण्यातून बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.