दोन्ही पाय नसतानाही त्याने खांबावर चढून केलं ध्वजारोहण; उद्योजक आनंद महिंद्रांचा सॅल्यूट

Anand Mahindu gave him the salute
Anand Mahindu gave him the salute

नगर : प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन आला की आपल्या देशप्रेमाला भरते येते. शाळेत असेपर्यंत झेंड्याला सलामी किंवा वंदन केले जाते. महाविद्यालयात गेलं ती उपस्थितीही कमी होऊन जाते. नोकरी, धंद्याला लागलेल्या बहुतेकजणांसाठी तर हे राष्ट्रीय सण म्हणजे केवळ हक्काची सुटी. तर काही टीव्हीवरील कार्यक्रम पाहूनच आपण किती राष्ट्रीय कार्य पार पाडतोय, असा आविर्भाव आणतात. तसंही देशप्रेमाची ठराविक अशी व्याख्या नाही आणि ते प्रकट करण्याचा ठराविक साचाही नाही. काल एका दिव्यांगाने असं काही केलं की पाहणाऱ्याची छाती अभिमानाने भरून यावी. तिरंग्यासोबतच त्याच्यातील विजुगिषा वृत्तीला सलाम करावा.

ध्वजारोहन असंही 
त्या दिव्यांग तरूणाने केले ध्वजवंदन अनोखे तर होतेच परंतु त्यापेक्षा देशप्रेमाचा उठता-बसता डांगोरा पिटणाऱ्यांना तसेच विरोधकांना देशद्रोही म्हणून टोमणं मारणाऱ्यांना नश्‍चितच खजिल करणारं होतं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी त्याबाबतचा व्हिडिओ शेअर करीत ट्‌वीट केलं आहे. महिंद्रा हे संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ केवळ तेरा सेकंदाचा आहे. तो काही वेळातच लाखो लोकांनी पाहिला आणि त्या दिव्यांग तरूणाच्या देशप्रेमाला दाद दिली. 

असं काय आहे त्या व्हिडिओत? 
त्या व्हिडिओत दोन्ही पाय नसलेला एक दिव्यांग व्यक्ती आहे, तो रस्त्याकडेच्या एका खांबावर चढून जातो, अर्थातच हाताने. एकदम वर गेल्यानंतर तो ध्वजारोहन केल्यासारखे आपले शरीर करतो. त्याच्या अंगात तिरंगा ध्वजासारखा पोशाख आहे. त्यामुळे जणूकाही आपल्या दिव्यांग शरीराच्या माध्यमातून 
ध्वजारोहन करीत असल्याचा भास होतो. त्यामुळे त्याच्या या देशप्रेमाला आपल्यालाही लाईक करावं वाटतं. 

महिंद्रा काय म्हणतात... 
उद्योगपती महिंद्रा याबाबत लिहितात, ""कालच मी हा व्हिडिओ शेअर करणार होतो. परंतु तो मला आज सकाळी मिळाला. परंतु असं प्रेरणा देणारं, स्वतःबद्दल सारखं वाईट वाटून घेणं थांबवणारं तसंच मोठी इच्छा असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा देणारं असं काही तरी पाहण्यासाठी कधीच उशिर झालेला नसतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com